खा. अशोकराव चव्हाणांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड-बिदर रेल्वेमार्गाला कर्नाटकच्या मंजुरीची आशा..!

नांदेड , रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नांदेड-बिदर नवीन रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाला मान्यता दिली असली, तरी कर्नाटक सरकारची संमती अद्याप प्रलंबित आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार अशोकराव चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी कर्नाटक सरकारने आपल्या वाट्याचा आर्थिक हिस्सा उचलावा, अशी मागणी केली होती. यावर शिवकुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. नांदेड-बिदर रेल्वेमार्गासाठी कर्नाटक सरकारची आवश्यक मंजुरी मिळावी, यासाठी चव्हाण यांनी गेल्या महिन्यात दिल्ली येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी प्रकल्पाला कर्नाटक सरकारची मंजुरी मिळावी, अशी आग्रही मागणी केली. शिवकुमार यांच्या सूचनेनुसार चव्हाण यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर पत्रही पाठवले होते.

या पत्राला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उत्तर दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खासदार अशोकराव चव्हाण यांनी समाजमाध्यमातून दिली.

कर्नाटकच्या भूमिकेमुळे अडथळा

या प्रकल्पाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा कर्नाटक सरकारच्या भूमिकेमुळे निर्माण झाला होता. २७ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक सरकारने पाठवलेल्या पत्राद्वारे या प्रकल्पातील आपल्या वाट्याच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यास इच्छा दर्शवली नव्हती. त्यामुळे नांदेड-बिदर रेल्वेमार्गाच्या पुढील प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

या रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारची मंजुरी मिळावी, यासाठी अशोकराव चव्हाण यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडेही दिल्ली दौऱ्यात प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी सर्व स्तरांवर आपला पाठपुरावा सुरू असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयात सकारात्मकपणे लक्ष घातल्याची बाब आनंददायी आहे. याबद्दल त्यांचे आभार. नांदेड-बिदर या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारकडून आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळतील, अशी आशा आहे,” असे अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…