मुख्यमंत्र्यांकडून ऑटोमॅटिक स्टीम आयर्न टेबल उपक्रमाची पाहणी

भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या पुढाकाराचे कौतुक; धोबी समाजातील लाभार्थ्यांना अत्याधुनिक साधनांचे वितरण

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उद्योग आघाडीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘देवाभाऊ रजत समृद्धी योजने’अंतर्गत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील व्यवसायिकांना वितरित करण्यात येणाऱ्या ऑटोमॅटिक स्टीम आयर्न टेबल उपक्रमाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. व्यवसायिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

भाजप प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद वावकोडकर यांच्या पुढाकारातून या योजनेअंतर्गत विविध लघु व्यवसायिकांना आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील धोबी समाजातील २० लाभार्थ्यांना अत्याधुनिक ऑटोमॅटिक स्टीम आयर्न टेबलचे वितरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दक्षिण-पश्चिम नागपूर येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व व्यावसायिक विकास उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या ऑटोमॅटिक स्टीम आयर्न टेबलची प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘देवाभाऊ रजत समृद्धी योजना’ ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांना साकार करणारी प्रभावी योजना असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची साधने पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद वावकोडकर यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील अन्य व्यवसायिकांनाही लवकरच या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती दिली. विविध व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…