जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडातील मृत बालकांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रहारचे रक्तदान शिबिर

आमदार बच्चू कडू यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले रक्तदान; दुःखाच्या प्रसंगी सामाजिक बांधिलकीचा संदेश

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) भीषण अग्निकांडात प्राण गमावलेल्या तीन नवजात बालकांना प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या चिमुकल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात आमदार बच्चू कडू यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. या उपक्रमात एकूण ४६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने अमरावतीसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. निष्पाप नवजात बालकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना केवळ शोक व्यक्त न करता सामाजिक संवेदना जपण्याच्या उद्देशाने प्रहार संघटनेने रक्तदान शिबिर आयोजित केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून मृत चिमुकल्यांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्यासह प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू वसू महाराज आणि महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनीही रक्तदान केले.

पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. प्रहार संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. शिबिरातून संकलित झालेल्या ४६ रक्तपिशव्या गरजू रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहेत. दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून मृत बालकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्याबरोबरच समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. यावेळी प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने, संपर्क प्रमुख गोलू पाटील, हॉकर्स युनियन शहर प्रमुख गणेश मारोटकर, प्रशांत देशमुख, नितीन शिरभाते, चेतन बर्डे, इमरान खान, प्रशांत शिरभाते, अनिल रामटेके, शेषराव धुळे, विक्रम जाधव, निलेश पानसे, अजय तायडे, नंदू वानखडे, कुणाल खंडारे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…