लकडगंज पोलिसांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर; १०० रक्तपिशव्या डागा रुग्णालयाला

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : पोलीस ठाणे लकडगंजच्या पुढाकाराने नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने रविवारी (३० ऑगस्ट) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून संकलित करण्यात आलेल्या १०० रक्तपिशव्या डागा शासकीय रुग्णालयाला रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिव अमृत फाउंडेशन, शहर व शहर मित्र परिवार, महादेव संस्थान, जुनी मंगळवारी, घास बाजार, रामपेठ-लकडगंज परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सकाळी ११.३० वाजता या समाजोपयोगी उपक्रमाला सुरुवात झाली. शिबिरात रक्तदात्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी, नोंदणी आणि सुरक्षिततेच्या सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले. पोलीस अधिकारी व अंमलदारांनीही स्वतः रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. या रक्तसाठ्यामुळे अपघातग्रस्त, गंभीर तसेच अत्यावश्यक रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मोठी मदत होणार आहे. रक्तदानाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची उपलब्धता वाढविण्यासोबतच नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी, पोलीस हवालदार नरेंद्र गिरडे, प्रवीण डाबरे, संघदीप लाझेवार, गजानन गिरी, सुरज देशमुख, निखिलेश शेंडे तसेच पोलीस शिपाई अनिल महतो, हेमंत उइके, तुकेश्वर चव्हाण, पवन पित्तलवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ चापले, कृष्णाजी कांबळी, जीवन पराते, निलेश रामगुणीवार, राहुल महादुले, अक्षय कोदलीकर, रोशन दामले, पवन सोनेकर आणि नागरिकांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा व जनसहभागाला चालना मिळाली. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सांगितले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…