इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे शरीरमुद्रा कार्यशाळा संपन्न

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे मदनगोपाल अग्रवाल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शरीरमुद्रा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी क्लबतर्फे सातत्याने उपक्रम राबविले जातात.

या कार्यशाळेत  संदीप अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना शरीरमुद्रांविषयी मार्गदर्शन केले. शरीरमुद्रा म्हणजे हात, बोटे आणि शरीराच्या स्थितीच्या माध्यमातून शरीरातील ऊर्जा संतुलित करण्याची प्राचीन योगविद्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचमहाभूत मुद्रा, ज्ञान मुद्रा, वायू मुद्रा, शून्य मुद्रा, पृथ्वी मुद्रा, प्राण मुद्रा आणि योगमुद्रा यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. दररोज १५ ते २० मिनिटे मुद्रा केल्याने तणाव कमी होण्यास, मन शांत व एकाग्र राहण्यास तसेच शरीरातील पंचतत्त्वांचे संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे शरीर निरोगी व ताठ राहण्यासही फायदा होतो, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या कार्यशाळेच्या संयोजिका  प्रज्ञा काळे होत्या. क्लबच्या अध्यक्षा  कविता दुरुगकर आणि सचिव डॉ. रीमा खराबे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका फाळके मॅडम यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…