प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे ही काळाची गरज : डॉ. अनिल दुधभाते

पुणे , आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) :  देशभरात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान नेत्रदान जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त डॉ. दुधभाते नेत्रालय अँड रेटिना सेंटर, पुणे यांच्या वतीने नेत्रदान जनजागृतीसाठी योगदान देणाऱ्या तसेच रुग्णांना उत्कृष्ट नेत्रसेवा उपलब्ध करून देणाऱ्या निवडक ऑप्टिशियन व्यावसायिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. दुधभाते नेत्रालयात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, पुणे महापालिकेचे नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, श्रीकांत जगताप तसेच माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अशोक हरणावळ प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेत्रालयाचे संचालक व प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल व त्यांच्या स्वलिखित ‘नेत्रकोष’ या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार केला. गिरीश वसेकर यांनी प्रास्ताविकातून नेत्रदानाचे महत्त्व आणि समाजात त्याबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज स्पष्ट केली. डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या १५ वर्षांच्या प्रवासात डॉ. अनिल दुधभाते यांनी एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया, एक हजारांहून अधिक मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे घेतली असून सहा लाखांहून अधिक रुग्णांची नेत्रतपासणी केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांनी नेत्रालयाच्या सेवेचे कौतुक केले. स्वतःच्या डोळ्यांचे ऑपरेशन याच नेत्रालयात झाल्याचे सांगत, “आज मला चष्म्याविना अतिशय छान दिसते,” असे त्यांनी नमूद केले. श्रीकांत जगताप व अशोक हरणावळ यांनीही नेत्रालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. डॉ. अनिल दुधभाते यांनी भारतातील नेत्रदानाची गरज, उपलब्ध नेत्रांची संख्या, नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज आणि जनजागृतीचे महत्त्व याबाबत उपस्थितांना माहिती दिली. “नेत्रदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो. या महान कार्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांनीही नेत्रदानाच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या नेत्रसेवेसह नेत्रदान जनजागृतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच स्वतः नेत्रदानाचा फॉर्म भरून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल हिराळकर यांनी केले, तर तन्मय करंजकर यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित ऑप्टिशियन व्यावसायिक व मान्यवरांना नेत्रदान संकल्पाचे फॉर्म देण्यात आले. नेत्रदानाचा संदेश समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रियंका एडके, गणेश मोटे, कोमल भोसले, गौरी निमकर, शीतल हिराळकर, गिरीश वसेकर, मार्केटिंग टीम तसेच डॉ. दुधभाते नेत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नाश्ता व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…