जड़का शहापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांचा धडाका; अवैध उत्खननावर गावकऱ्यांसह धाड टाकून खाण माफियांचे धाबे दणाणले!

अमरावती ,राज माहोरे ( प्रतिनिधि ) : मौजा शहापूर येथील सर्व्हे नं. १३ मधील खाणीत नियम धाब्यावर बसवून रोज सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननाविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांनी गावकऱ्यांच्या साथीने थेट खाणीवर धडक मारत मोठा भांडाफोड केला. या आक्रमक कारवाईमुळे खाण माफियांची पळापळ झाली असून, माहिती मिळताच महसूल प्रशासनाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी घटनास्थळी धाव घेऊन अवैध कामाचा स्थल पंचनामा केला.

रोज रात्री-अपरात्री बेकायदेशीर उत्खनन

सर्व्हे नं. १३ (क्षेत्र ४०४ आर) मधील जमिनीवर शासकीय नियमांची पायमल्ली करत रोज मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांना ही माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेऊन थेट खाणीवर धाड टाकली आणि सुरू असलेला गैरप्रकार रंगेहात पकडला.

अ‍ॅटलास कॉम्प्रेसर अन् पोकलँड जप्त करण्याच्या तयारीत प्रशासन

धर्माळे यांच्या आक्रमक पवित्रा आणि गावकऱ्यांच्या रोषामुळे महसूल मंडळाधिकारी (सी. बी. वाघमोडे) व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दुपारी १२.३० ते १.१५ या वेळेत पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पाहणीत ११ फूट खोलीचे व १०० mm चे तब्बल ११ बोअर (खड्डे) बेकायदेशीरपणे पाडल्याचे उघड झाले. २४ ऑगस्टपासून ड्रिल मशीनद्वारे हे बोअर पाडल्याची कबुली खाण मॅनेजर पंकज कैलास ठोके याने दिली. तसेच पश्चिमेला कोबेलको कंपनीची पोकलँड मशीन सज्ज आढळून आली.

परप्रांतीय रॅकेटचा पर्दाफाश

घटनास्थळी पकडलेला ड्रिल मशिन ऑपरेटर अंगद रामेश्वर सहानी (वय २२, रा. देवरिया, उत्तर प्रदेश) याने हे मशिन ‘रिनु शेखावत’ (रा. राजस्थान) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. परराज्यातून मशिनरी आणि कामगार आणून स्थानिक प्रशासनाचा महसूल बुडवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा या धाडीमुळे पर्दाफाश झाला आहे. दोषींवर गुन्हे दाखल करा, अन्यथा गाठ माझ्याशी: आशीष धर्माळे

या पंचनाम्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांच्यासह विद्यासागर ढोले, रविंद्र काकडांदे, अजय गवई, दिलीप ठाकरे या पंचांच्या व अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. “निसर्गाचा ऱ्हास करणारा आणि शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणारा हा दरोडा खपवून घेतला जाणार नाही. खाण मालक, मॅनेजर आणि यात सामील सर्व सूत्रधारांवर तात्काळ कडक गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडू!”

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…