महाराष्ट्रात पावसाचा दुहेरी रंग; ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भात मात्र पावसाची प्रतीक्षा

कोकण-घाटमाथ्यावर जोरदार सरी; नागपूरमध्ये २१ टक्के पावसाची तूट, खरिपाची चिंता कायम

मुंबई :    राज्यात सध्या पावसाचं चित्र विरोधाभासी दिसून येत आहे. एकीकडे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह राज्यातील ११ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावरही जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात प्रवास करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भाच्या इतर भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नागपूर जिल्ह्यात १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान ४८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल २१ टक्के कमी आहे. गेल्या बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पिकांना पाण्याची गरज भासत आहे. संपूर्ण विदर्भातही पावसाची तूट १३ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर असला, तरी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…