कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे 33,826 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नागरिकांना नदीपासून दूर राहण्याचे आवाहन

सातारा :  सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी (1 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 6 फूटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे कोयना नदीत एकूण 33 हजार 826 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोयना सिंचन विभागाच्या माहितीनुसार, सांडव्यावरून 32 हजार 776 क्युसेक्स तर धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1 हजार 50 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

याशिवाय ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मतदार नोंदणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस विशेष शिबिरे

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ): विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर 19, 20,…

नांदेडमध्ये जमीन व्यवहाराच्या नावाखाली 11.85 कोटींचा महाघोटाळा

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेडमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली तब्बल 11 कोटी 85 लाख रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. मौजे मेंढला खुर्द येथील गट नंबर 73 मधील जमीन…