१७ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या घरी प्रत्येकाने एक दिवा लाऊन देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद द्यावेत!

भाजपा अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व जिल्हा सरचिटणीस सौ. शुभांगी सप्रे यांचे नागरिकांना आवाहन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : १७ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे. २५ वर्षात भारताला एक महासत्तेपर्यंत पोहचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेले आहे. त्यासाठी मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद म्हणून नागरिकांनी एक दिवा सायंकाळी आपल्या घरी लावावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग व जिल्हा सरचिटणीस सौ. शुभांगी सप्रे यांनी केले आहे.

दिनांक १७ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात “एक दिवा आशीर्वादचा ! विकसित भारत संकल्पाचा!” दिवा घरोघरी लाऊन मोदींचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आपण घरोघरी हा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग व जिल्हा सरचिटणीस सौ. शुभांगी सप्रे यांचेसह जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर खरमारे, अमोल भनगडे, सुभाष दुधाडे, संतोष म्हस्के यांनी केले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील, ना. प्रा. रामजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष माजी. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, यांचे तसेच विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य सर्व मा. आमदारांच्या नेतृत्वात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस जिल्ह्यात साजरा होत आहे. असे सौ. सप्रे यांनी सांगितले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मराठवाड़ा की प्यास बुझाएगा 20 हजार करोड़ का वॉटर ग्रिड!

मराठवाड़ा का नाम सामने आते ही सबसे पहले पानी की किल्लत और सूखे की तस्वीर सामने आती है। सालों से यहां के लोग पानी की समस्या से जूझ रहे हैं।…

रोटरी क्लब अहिल्यानगरचा ‘स्वर दीपावली’ कार्यक्रम दिमाखात संपन्न!

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यावसायिक युगात माणसामाणसांमधील दुरावा वाढत असताना, रोटरी क्लब अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीचा अनोखा अनुभव देणारा…