अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे ‘पावन गणेश मित्र मंडळा’तर्फे २२ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणपती उत्सवाच्या काळात मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम विशेष ठरला.
अहिल्यानगर येथील रा. स्व. संघ जनकल्याण रक्तपेढीच्या टीमने या शिबिरात रक्तसंकलन केले. रक्तदान शिबिराला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तपेढीचे डॉ. मनोहर देशपांडे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. पावन गणेश मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेला हा समाजोपयोगी उपक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.


