स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे एकीकडे शुल्कमाफी, दुसरीकडे बॅकलॉग परीक्षेचे शुल्क

नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हद्दीतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक जारी केले असतानाही काही महाविद्यालयांकडून बॅकलॉग परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार संबंधित दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज परीक्षा शुल्काशिवाय स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, काही महाविद्यालयांमध्ये बॅकलॉग परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, विद्यापीठाने बॅकलॉग परीक्षेचे पैसे घेण्यास सांगितले आहे, असे उत्तर दिले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी नेमकी कशी केली जात आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने बॅकलॉग परीक्षेच्या शुल्काबाबत तात्काळ स्पष्ट आदेश जारी करावेत, तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्यास ते त्वरित थांबवून त्यांना शुल्कमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. शुल्क आकारणी त्वरित थांबवून विद्यार्थ्यांना दिलासा न दिल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फैसल सिद्दीकी यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना अमितसिंघ सूखमणी, सय्यद नावेद, चंदू ठाकूर, मोहसीन खान, शेख मेहराज, निखिल गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…