सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द

मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना ITAT मध्ये दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधातील आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32.14 कोटी रुपयांची रक्कमही रद्द केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात निधन झाले, त्यानंतर सुनेत्रा पवार यांची भूमिका केवळ प्रक्रियेसाठी रेकॉर्डवर घेण्यात आले होते. अजित पवार (Ajit Pawar) आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये काही कथित व्यवहारांचे प्राप्तकर्ते होते,आयटीएटी खंडपीठाला पुरावा अपुरा आढळला आहे.(Ajit Pawar)
तेन पुजारी यांच्याकडून ट्रायटन ग्रुपच्या डायऱ्या आणि वह्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यात DD नावाच्या व्यक्तीच्या नावे 32 कोटींचे व्यवहार आयकर विभागाला आढळले, आणि त्या आधारे हे ‘DD’ हे अजित पवार असावेत ह्या तर्काच्या आधारे अजित पवार यांच्या उप्पन्नाचे मुल्यांकन करण्याची कारवाई IT विभागाने केली. मात्र सुनावणी दरम्यान ITAT समोर ‘DD’ म्हणजे अजित पवार हे सिध्द करण्यास इनकम टॅक्स विभाग अपयशी ठरल्याचे सुनावणी दरम्यान दिसून आले आणि ITAT ने अजित पवार यांना क्लिनचीट दिली आहे. (Ajit Pawar)
आयटीएटीने असा निष्कर्ष काढला की, आयकर अधिकाऱ्याने सादर केलेल्या पुराव्यांवरून त्याचे समाधान झाले असले तरी, जप्त केलेला माल आणि अजित पवार यांच्यात एक स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारा दुवा प्रस्थापित करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यानुसार, आयकर अधिकाऱ्याची कारवाई रद्द करण्यात आली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कायदेशीर वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांना ‘आयकर अपील न्यायाधिकरणा’कडून (ITAT) मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या नावावर जोडलेले ३२.१४ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न आणि त्यावरील कायदेशीर कारवाई न्यायाधिकरणाने रद्द ठरवली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…