अजितदादांची उणीव भरुन काढण्याची क्षमता जय पवारांमध्ये, त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं, अमोल मिटकरींची मागणी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची चढाओढ वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत असून त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रिक्त होणाऱ्या जागेसाठी जय पवार यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या नंतर पक्षाला एक विश्वासू आणि युवा चेहरा पुढे आणण्याची गरज असून जय पवार हे त्यासाठी योग्य उमेदवार असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. काहींना हे घराणेशाही वाटू शकतं, मात्र भविष्यात महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता जय पवार यांच्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. एका जागेसाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असून महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे त्यांचे 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला एकच जागा सहज मिळू शकते. निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी झाली असून 30 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 2 मे रोजी छाननी, 4 मे रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान 12 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. संपूर्ण प्रक्रिया 13 मे 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…