सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले. त्यामुळे, उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र, बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होऊन आमदार झाल्यानंतरच त्यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा (Resignation) दिला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अनपेक्षितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे.
सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या असल्याने त्यांनी आपला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असते. त्यामुळेच, आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, त्यांची आपला खासदारकीचा राजीनामा दिला. आता, लवकरच सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होईल. त्यानंतर, येथील राज्यसभेच्या जागेवर कोणाची नियुक्ती होईल, याची उत्सुकता आता राष्ट्रवादीसह इतरही राजकीय नेत्यांना लागली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही खासदार बनले आहेत. गेल्याच महिन्यात पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली होती.
नुकतेच झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 2 लाख 18 हजार 930 मतं मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या 22 उमेदवार आणि ‘नोटा’ यांना 4837 इतकी मते मिळाली. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे, विक्रमी मतांनी सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, करुणा शर्मा, अभिजीत बिचुकले यांच्यासह 22 उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. कार्यकर्ते, पार्थ पवार आणि जय पवारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवारांना विक्रमी मते मिळाली आहेत. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…