अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : महाराष्ट्रात बहुतांश भागात घरोघरी गौरी-गणपतीची स्थापना केली जाते. भक्तिभावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पारंपरिक उत्सवात महिला वर्ग आपल्या कल्पनेप्रमाणे देखावे साकारतात. अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात राहणारे राजेश परदेशी व सौ. परदेशी यांनी त्यांच्या घरी गौरी-गणपतीनिमित्त यावर्षी “आपत्ती व्यवस्थापनातून सुरक्षितता” हा देखावा सादर केला आहे.
पर्यावरणाचे रक्षण केल्यास नैसर्गिक आपत्ती टाळल्या जाऊ शकतात, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नांचा विचार कौटुंबिक स्तरावर झाल्यास समाजातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते, अशा भावना देखावा पाहण्यासाठी आलेल्या स्नेही मंडळींनी व्यक्त केल्या. तसेच परदेशी दाम्पत्याचे कौतुक केले.


