सघोष पथसंचलनाने वेधले नाशिककरांचे लक्ष

शहरातील उपनगरांमधून २१०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग

नाशिक (प्रतिनिधी) : असत्यावर सत्याच्या आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमी उत्सवाच्या औचित्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नाशिक शहरातील विविध उपनगर, नगर व गटांच्या वतीने पूर्ण गणवेशात आणि स-दंड भव्य विजयादशमी पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले. या शिस्तबद्ध संचलनांनी आणि शस्त्रपूजन कार्यक्रमांनी नाशिक नगरीत देशभक्तीमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या या संचलनांमध्ये विविध शाखांमधून आलेल्या २१०० पेक्षा अधिक तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक व प्रौढ स्वयंसेवकांनी शिस्तीत सहभाग नोंदवला.

शस्त्रपूजन आणि शिस्तबद्ध संचलनाची रेलचेल

शहरातील विविध नगरांमध्ये परंपरेनुसार उत्साहात शस्त्रपूजन आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले. या पथसंचलनाचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले.

गुरुगोविंद सिंग नगर (इंदिरानगर) : आर. के. लॉन्स, पाथर्डी फाटा येथून सुरू होऊन दामोदर चौक, अंबिका हार्डवेअर, सिग्नस हॉस्पिटलसमोरील मार्गाने संचलन पार पडले.

मोदकेश्वर नगर (इंदिरानगर) : श्री गणेशबाबा मंदिर, अशोका मार्ग येथून कल्पतरू गार्डन मार्गे स्वयंसेवकांच्या सहभागात हे संचलन झाले.

मखमलाबाद नगर : श्री साई गणेश मंदिर (सुदर्शन नगर) येथून निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाकर घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी संचलन पार पडले.

एकलहरा नगर (नाशिकरोड) : मारुती मंदिर, अस्वले मळा येथे शस्त्रपूजन उत्सव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पळसे गाव येथून संचलन निघाले.

उपनगर : सुभेदार रामजी सभागृह येथून सुरू होऊन मनपा हॉस्पिटल, महारुद्र कॉलनी, इच्छामणी गणपती मंदिर, व्यापारी बँक चौक मार्गे उत्साहात समारोप झाला.

पवननगर (सिडको) : डॉ. हेडगेवार मैदान येथून सुरू होऊन विविध मार्गांनी मार्गक्रमण करत पोस्ट ऑफिस, पाटीलनगर मैदानावर संचलनाची समाप्ती झाली.

अंबड नगर (सिडको) : छत्रपती संभाजी स्टेडियम येथून प्रारंभ होऊन स्व. संजय राका चौक, सिंहस्थ नगर मार्गे पुन्हा स्टेडियमवर समारोप झाला.

जुने सिडको नगर : अपेक्षा हॉस्पिटलसमोरील मैदानावरून अपोलो मेडिकल मार्गे शिस्तबद्ध संचलन पार पडले.

पंचवटी गट : श्री गणपती मंदिर, ४४ मेनरोड येथे स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होऊन संचलन झाले.

सावरकर नगर (भोंसला) : संसरी येथील मारुती मंदिरासमोरील मैदानावरून निघून खंबाची गल्ली मार्गे संचलन पुन्हा मंदिराकडे आले.

टिळक नगर व सोमेश्वर नगर (भोंसला) : केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज मैदान आणि महात्मा नगर क्रिकेट मैदानावरून सायंकाळी संगीतमय घोष पथकाच्या तालावर संचलनाचे आकर्षक आयोजन करण्यात आले.

सातपूर नगर (भोंसला) : स्वामी समर्थ केंद्र येथून कडेपठार १०० फूट रोड मार्गे उत्साहात पथसंचलन पार पडले.

प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती

या संचलन व शस्त्रपूजन सोहळ्यात विविध भागांतील प्रतिष्ठित व मान्यवर नागरिकांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर कड, महंत भक्तीचरणदास, सराफ व्यावसायिक जय भोसले, विख्यात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख आणि निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाकर घाडगे आदी मान्यवरांनी स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला.

नागरिकांकडून पुष्पवृष्टी

शिस्तबद्ध पदमिलाफ, तालबद्ध घोष आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधले. जागोजागी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिलेल्या नागरिकांनी, महिलांनी आणि ज्येष्ठांनी पुष्पवृष्टी करत या शिस्तबद्ध संचलनाचे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण स्वागत केले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक उत्साह, संघशक्ती, शिस्त आणि एकात्मतेचे विहंगम दर्शन घडवणारे हे विजयादशमी पथसंचलन नाशिककरांच्या स्मरणात राहणारे ठरले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…