शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : चंद्रशेखर बावनकुळे

तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी; वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री बावनकुळे यांनी तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी सोयाबीनचे दाणे परिपक्व अवस्थेत आलेले नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संपर्काची समस्या असल्यास पंचनामे ऑफलाइन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाहणीचा अहवाल शासनाकडे सादर करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, कापूस, तूर आणि संत्रा पिकांना सिंचनाची व्यवस्था झाल्यास काही दिवस पिके तग धरू शकतात. मात्र, काही भागात कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याची दखल घेत बावनकुळे यांनी शेताच्या बांधावरूनच संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. नादुरुस्त सोलार कृषीपंपांची दोन दिवसांत दुरुस्ती करण्याच्या सूचनाही कंत्राटदारांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. गेल्या वर्षीही १,१४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असून, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे पाटील, सह जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार आशीष नागरे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…