शारदीय नवरात्र महोत्सव : चतुर्थीला अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आई अंबाबाई

पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ च्या चतुर्थी तिथीला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आहे.

महिषासुराचा संहार झाल्यावर सर्व देवांनी देवीकडे वरदान मागितले की, पुन्हा ज्या वेळेला एखादा दानव आम्हाला त्रास देईल, त्यावेळेला तू आमच्या सहाय्यासाठी धावून ये. याच वरदानाला अनुसरून शुंभ आणि निशुंभ नावाच्या दैत्यांनी उपद्रव माजवल्यानंतर सर्व देव गंगा किनारी एकत्र येऊन देवीचे स्तवन करू लागले. त्यावेळेला देवी पार्वती त्या ठिकाणी आली. तिने त्यांना विचारले की, तुम्ही कोणाचे स्तवन करत आहात? त्यावेळेला पार्वतीच्या शरीरातून महासरस्वती प्रकट झाली, जिने हातामध्ये घंटा, त्रिशूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य-बाण आणि कमळ धारण केले होते. अशा अप्रतिम सौंदर्यखाणी असलेल्या जगदंबेच्या प्राकट्यानंतर पार्वती काली रूपात प्रकट झाली. त्यावेळेला देवीच्या या सौंदर्याचे वर्णन चंडमुंड नावाच्या दैत्यांनी शुंभ-निशुंभाकडे केले आणि त्यांना सांगितले की, तुम्ही या स्त्रीबरोबर विवाह केला पाहिजे. त्याप्रमाणे त्या स्त्रीला अर्थात देवीला आणण्यासाठी असुरांनी दूताला पाठवले.

देवीने त्याला उलट पावली निरोप घेऊन पाठवले की, जो पुरुष मला युद्धात जिंकेल, त्याच्याशी विवाह करेन, असा माझा पण आहे. त्याप्रमाणे माझा निरोप कळवा. दैत्यांनी हा निरोप ऐकल्यावर धूम्रलोचन नावाच्या राक्षसाला पाठवले. तो केवळ देवीच्या हुंकाराने भस्म झाला. त्यानंतर चंडमुंडाला पाठवले. या दोघांना भगवती कालीने अर्थात चामुंडेने यमसदनाला पाठवले. यानंतर रक्तबीज नावाचा राक्षस आला. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस तयार होत होता. म्हणून देवीच्या सहाय्यासाठी प्रत्येक देवाची शक्ती मूर्तिमंत रूप घेऊन आली. ब्रह्माची ब्रह्माणी, शंकराची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, इंद्राची इंद्राणी, नरसिंहाची नारसिंही, वराहाची वाराही, विष्णूची वैष्णवी आणि शिवदूती चामुंडा अशा अष्टमातृका युद्धाला आल्या. शेवटी महाकालीच्या मदतीने महासरस्वतीने त्याचा नाश केला.

त्यानंतर निशुंभ आला. निशुंभाचा वध झाल्यावर, ‘तू एकटी स्त्री आहेस, असे सांगितले होतेस; पण एवढ्या सगळ्या जणींना घेऊन तू युद्ध करत आहेस,’ असे तो म्हणाला. त्यावेळेला देवीने या सगळ्या मातृकांना स्वतःमध्ये सामावून घेतले. याच रूपात आज जगदंबेची पूजा साकारली आहे. देवीचे हे स्वरूप कात्यायन ऋषींच्या आश्रमात प्रकट झाले म्हणून तिला कात्यायनी असे नाव मिळाले. ही भगवती कामदुर्गा कात्यायनी भक्तांच्या इच्छा पूर्ण करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना.

श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…