व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडरसह वाहन जप्त

नांदेड , रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ): व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या इसमावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडरसह टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहन असा एकूण ८ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

१३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना, उस्माननगर रस्त्यावरील कोहिनूर मिलच्या विरुद्ध बाजूस एका छोट्या हत्ती वाहनातून व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांसमक्ष दुपारच्या सुमारास पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी टाटा इंट्रा छोटा हत्ती क्रमांक MH-26-CH-4677 हे वाहन संशयितरीत्या आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आढळून आले.

पोलिसांनी वाहनातील इसमाची चौकशी केली असता, त्याने सदर गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्री व रिफिलिंगसाठी आणल्याचे सांगितले. गॅस सिलिंडरची वाहतूक व विक्री करण्याबाबत त्याच्याकडे कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे आढळून आली नाहीत. या कारवाईत टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहन (MH-26-CH-4677) अंदाजे किंमत ६ लाख रुपये तसेच भारत कंपनीचे व्यावसायिक वापराचे गॅसने भरलेले लाल व पिवळ्या रंगाचे एकूण ५२ सिलिंडर, अंदाजे किंमत २ लाख ३४ हजार रुपये, असा एकूण ८ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

ज्येष्ठ विधिज्ञ अँड. के. डी. धुमाळ यांना ‘आनंदोत्सव’चा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते अँड. के. डी. धुमाळ यांची सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व…

महापालिकेकडून विसर्जनस्थळांची पाहणी; सुरक्षिततेच्या उपाययोजनांना वेग

नांदेड : आगामी गणेशोत्सव व श्री विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरातील…