विदर्भातील शाळा आता ३० जूनपासून; नागपूर खंडपीठाच्या निर्देशांनंतर शिक्षण विभागाचा निर्णय बदलला

नागपूर: उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र नागपूर खंडपीठाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला असून आता विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होणार आहेत. याआधी शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या पत्रानुसार विदर्भातील शाळा २२ जून ते ३० जूनदरम्यान सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश दिले होते. मात्र या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच यापूर्वीच्या न्यायालयीन आदेशांचा विचार न करता नवीन आदेश का काढण्यात आला, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.सुनावणीनंतर शिक्षण संचालकांनी जारी केलेली दोन्ही पत्रे रद्द करण्यात आली. त्यानुसार विदर्भातील सर्व शाळा आता ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे विदर्भातील सुमारे २० हजार शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागांतील शाळा नियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासून सुरू होणार आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…