तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना; कार्बन डायऑक्साईड गळतीने दोन कामगारांचा मृत्यू, दोघे उपचाराधीन

पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशामक यंत्रणेच्या देखभाल कामादरम्यान फायर एक्सटिंग्विशर सिलेंडरमधून कार्बन डायऑक्साईड वायूची गळती झाल्याने ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक १ मधील नवलाख उंबरे येथील शाफलर इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये अग्निशामक सिलेंडरच्या वार्षिक तपासणी व दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम चिंचवडस्थित उषा फायर सेफ्टी इक्विपमेंट्स कंपनीकडून करण्यात येत होते.काम सुरू असताना एका फायर एक्सटिंग्विशर सिलेंडरची सेफ्टी पिन अचानक निसटल्याने उच्च दाबाने कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडला. या गळतीमुळे घटनास्थळी उपस्थित काही कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊन ते बेशुद्ध पडले बेशुद्ध झालेल्या कामगारांना तत्काळ सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैभव भाऊसाहेब थोरात (वय २४, चिखली, पुणे) आणि गौरीशंकर शर्मा (वय ३८, आंबी, ता. मावळ) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर प्रमोद जैस्वार आणि नरसिहा पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…