रायपूर सार्वजनिक वाचनालयास वायसीसीईकडून 100 हून अधिक पुस्तकांची भेट

नागपूर, राजेंद्र पहाडे ( प्रतिनिधी ) : यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वायसीसीई), नागपूरच्या ग्रंथालयातर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत रायपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयास 100 हून अधिक पुस्तके दानस्वरूपात देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच विविध विषयांवरील ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमासाठी वायसीसीईचे प्राचार्य डॉ. उदय वाघ तसेच अधिष्ठाता नियोजन आणि विकास डॉ. अरविंद भगत पाटील यांनी विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. पुस्तकदान कार्यक्रमास रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश आंबटकर, उपसरपंच चिराग शेटे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसचिव शैलेंद्र टेंभुर्ने तसेच सार्वजनिक वाचनालयाचे ईश्वर डोंगरे व इतर कर्मचारी, गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. तसेच एनएसएस युनिटचे विद्यार्थी अनुराग रुंधे, हिमांशू किरपाल, उन्नती हर्षे, निर्जन राऊत, रौनित यादव, मुस्तकीम शेख, चिन्मय यादव आणि कनाड नेऊरगावकर यांनीही सहभाग घेतला. वायसीसीई ग्रंथालयाचे डॉ. राजेंद्र पहाडे, देवराव काळे आणि संजय जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील निवडलेल्या गावांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयास ही पुस्तके देण्यात आली. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके सहज उपलब्ध होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास आणि वाचनाची आवड जोपासण्यास मदत होणार आहे. यावेळी ग्रामपंचायत व सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी वायसीसीईच्या ग्रंथालयाचे तसेच प्रशासनाच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. वायसीसीईच्या ग्रंथालयातर्फे शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्था व सार्वजनिक वाचनालयांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

वेकोलि में सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 का शुभारंभ

नागपूर,प्रणय डाबरे (प्रतिनिधि) : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में सोमवार, 26 अक्टूबर 2026 को सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 का शुभारंभ किया गया। इस अवसर पर वेकोलि के अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक डॉ.…

विदर्भ को दुष्कालमुक्त बनाने पर जोर, जलसंरक्षण और फसल नियोजन को बताया जरूरी; नितिन गडकरी का आह्वान

नागपुर : विदर्भ में सूखे की समस्या केवल खेतों तक सीमित नहीं है, बल्कि इसका असर किसानों की आर्थिक स्थिति और ग्रामीण जीवन पर भी पड़ता है। ऐसे में किसानों…