राज्यात 30 हजार शिक्षकांची मेगाभरती; पसंतीक्रम भरण्यास 11 ऑगस्टपर्यंत मुदत

‘पवित्र’ पोर्टलवरून होणार भरती; 19,881 पदे मुलाखतीशिवाय, 10,328 पदांसाठी मुलाखत

मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपली असून तब्बल 30 हजार 209 रिक्त शिक्षक पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच विविध शासकीय संस्थांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती ‘पवित्र’  पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने केली जाणार आहे.

शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये 19 हजार 881 पदे मुलाखतीशिवाय, तर खासगी संस्थांमधील 10 हजार 328 पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. भरतीमध्ये जिल्हा परिषदांची 13,351, महानगरपालिकांची 1,954, नगरपालिका व नगरपरिषदांची 280, खासगी शैक्षणिक संस्थांची 12,148, आदिवासी विकास विभागाच्या शाळांची 2,421 आणि शासकीय विद्यानिकेतनची 56 पदे अशा एकूण 30,209 रिक्त जागांचा समावेश आहे. इयत्तानिहाय पाहिल्यास पहिली ते पाचवीसाठी 14,320, सहावी ते आठवीसाठी 10,012, नववी-दहावीसाठी 5,513 आणि अकरावी-बारावीसाठी 364 पदे भरली जाणार आहेत.

दरम्यान, भरतीतील नेमकी किती पदे भरली जाणार, याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून रिक्त पदांपैकी 80 टक्के म्हणजे सुमारे 24 हजार पदे भरली जातील, असे सांगण्यात आले. मात्र, शासकीय प्रसिद्धीपत्रकात 30 हजार पदांची भरती होणार असल्याचा उल्लेख असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 6 ऑगस्ट 2026 पासून ‘पवित्र’ पोर्टलवर पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पसंतीक्रम लॉक करणे अनिवार्य असून, त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…