योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन मैदानात; भिवापूरात विमुक्त-भटक्यांसाठी विशेष शिबिर

भिवापूर,राज माहोरे (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल व वन विभागाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि. २७, २८ व २९ सप्टेंबरदरम्यान आयोजित या अभियानांतर्गत २९ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत भिवापूर–विरगव्हाण अंतर्गत नदीतील शिव मंदिर, भिवापूर येथे शिबिर घेण्यात आले.

शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजना, महसूलविषयक सेवा, पुरवठा विभागाच्या योजना, आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध शासकीय सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक सहकार्य केले. यावेळी तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार (महसूल) आशिष नागरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शीतल आंबटकर, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद खडसे, ग्राम महसूल अधिकारी डी. के. मेश्राम तसेच आरोग्य सेवक केतन पोपळी उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच मनोज चव्हाण, माजी उपसरपंच अंकुश राठोड, सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव, ज्ञानेश्वर राठोड, ईश्वर राठोड, सिद्धार्थ ढेंबरे, गजानन जाधव, अनिल आडे तसेच तुकाराम चव्हाण, दारासिंग राठोड, श्रीकृष्ण चव्हाण, राजू भाऊ राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी, जनार्दन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील पात्र नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी अशा विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, नागरिकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…