पुणे,उमेश आबनावे (प्रतिनिधी) : मेट्रोच्या कामामुळे शिवनेरी पथ येथील चाफळकर कॉलनी, सुपार्श्वनाथ बंगलो सोसायटी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारीनंतर महामेट्रोचे अधिकारी, स्थानिक वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यात तातडीने चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्थानिक रहिवाशांच्या ये-जा करण्यासाठी एक लेन खुली ठेवण्यासह बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्ता खुला करण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या समस्येवर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन मार्ग काढल्याबद्दल वाहतूक विभागाचे खरात साहेब, महामेट्रोचे अतुल गाडगीळ सर व अविनाश कुमार, तसेच पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाचे प्रमुख राजेशजी बनकर साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सौ. तन्वी प्रशांत दिवेकर, उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, पुणे महानगरपालिका तथा नगरसेविका, पुणे महानगरपालिका आणि श्री. प्रशांत प्रभाकर दिवेकर, समन्वयक, पर्वती मतदारसंघ तथा अध्यक्ष, रम्यनगरी को-ऑप हौसिंग सोसायटी यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.


