महायुतीचे विधानपरिषद उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा गृहभेटी व संवाद

विजयासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन

नागपूर,प्रणय डाबरे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष-महायुतीचे विधानपरिषद उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने प्रचाराची दिशा, संघटनात्मक समन्वय आणि महायुतीच्या विजयासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली.

या संवादादरम्यान ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महायुतीची विकासाभिमुख भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच उमेदवाराच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असून, परस्पर समन्वय आणि संघटनात्मक ताकदीच्या बळावर विजयाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी संदीप जाधव, सौ. मोहिनी रामटेके, प्रभाकर येवले, सुधीर जांभूळकर, गणेश कानतोडे, शिवनाथजी पांडे, गोपी कुमरे, पवन किरपाने, उमेश बुटे, खेमराज पारधी, राजेश हाथीबेड, सोनू मिश्रा, चंदू सदावरते, नगरसेवक किरण मणपिया, अमित पांडे, संजय तरारे, पप्पू वासवानी, देवानंद सातपुते, रविंद्र डोंगरे, सुनील गवाळे, ओमप्रकाश इंगळे आणि संजय शेंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी समन्वयाने काम करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात सहभागी होऊन सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…