मराठवाडा विभागात बूथस्तरावर लक्ष केंद्रित करा : सुनील राणे

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : मराठवाडा विभागात सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक जिल्हे छत्रपती संभाजीनगर पूर्व व पश्चिम, नांदेड महानगर व नांदेड दक्षिण या जिल्ह्यांत प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना भाजपा जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, खासदार, आमदार तसेच जिल्हा कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन पक्ष संघटना अधिक बळकट करणे, बूथस्तरावरील कार्य प्रभावीपणे पार पाडणे आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील बूथस्तरावरील अंत्योदयापर्यंत पोहोचविण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियतेने काम करावे. प्रत्येक बूथस्तरावर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन झालेच पाहिजे, असे प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा प्रभारी माजी आमदार सुनील राणे यांनी बैठकीदरम्यान सांगितले.

मराठवाडा विभागातील ‘कार्यकर्ता संवाद-संपर्क’ या प्रवासादरम्यान जनसंघ ते भाजपा असा प्रवास करणारे छत्रपती संभाजीनगर येथील श्री. बसैये बंधू आणि नांदेड महानगरातील पूर्व शिक्षक जनार्दन ठाकूर या भाजपा परिवारातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांचे अनुभव व विचार जाणून घेताना गहिवरून आले, असे सुनील राणे यांनी सांगितले. या सर्व ज्येष्ठांचा संघर्षमय जीवनप्रवास अनमोल असून, भाजपा परिवाराच्या नात्याने आम्ही सदैव सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…