पुणे , राजन शेळके ( प्रतिनिधी ) : आचलेरकर सरचिटणीस बोमरेओ यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा 26 वर्षांचा इतिहास सभासदांना सांगितला. 99 साली स्थापन झालेल्या संघटनेने 24 साली रौप्यमहोत्सव साजरा केला आहे. या काळात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सांगितली.
पूर्वांचलमधील मुलींना पुण्यात विविध प्रकारे मदत केली जाते, तळेगाव दाभाडे येथील शाळकरी मुलींना ड्रेससाठी कापड आणि शिलाईसाठी रक्कम दिली जाते. सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण 3.5 कोटी रुपयांवर केले आहे, हे आवर्जून सांगितले. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना संघटनेतर्फे आर्थिक मदत केली जाते.
कृषिमित्र ही बँकेतील निवृत्त कृषी अधिकाऱ्यांची एक चळवळ आहे. राजगड तालुक्यातील गुहिनी या गावात कुक्कुटपालन आणि मधमाशीपालनासाठी हे सर्व अधिकारी मार्गदर्शन आणि साहाय्य करत असतात. सर्व निधी सभासद स्वतःच्या निवृत्तीवेतनातून देत असतात. सभासदांच्या पंचाहत्तरीनिमित्त संघटनेकडून सत्कार केला जातो. संघटनेचे संस्थापक श्री. बाळासाहेब फडणवीस यांनी दिलेल्या विचाराप्रमाणे, ज्या समाजाने आपल्याला आज जे वैभव दिले आहे.


