मुंबई, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) अंतर्गत स्थानिक रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि पर्यावरणीय समस्यांबाबत मा. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषदेचे उपसभापती मा. ना. सचिनजी अहिर साहेब यांच्या दालनात संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिकांना ८० टक्के रोजगार, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, अनुभवी स्थानिक कामगार आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कोळसा उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. ही बैठक केवळ चर्चा करण्यासाठी नव्हती; वर्षानुवर्षे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो स्थानिकांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला नवी दिशा देणारे हे महत्त्वाचे पाऊल आहे.
या बैठकीला संजय भाऊ देशमुख, प्रवीण भाऊ हेंडवे, रोशन राजाराम हरबडे, नंथू नवले, राजू खामनकर, श्रीनिवास येडलावार, सागर पासूला, प्रकाश रंभाजी, रवींद्र ताजने, भारत चौधरी, नितेश नक्षीने, गणराज राजूरकर, संदीप वैरागडे, मनोज परचाके, अमोल मांढरे, थामदेव डेंगळे, नितेश चौरे आणि स्वप्निल पुनवटकर उपस्थित होते.


