पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; 8 जण गंभीर जखमी

पुणे : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौडजवळ मध्यरात्री भरधाव कारची उभ्या पीक अप गाडीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा पुणे-कोलाड महामार्गावर ही घटना घडली आहे. पौडच्या विठ्ठलवाडी फाटा परिसरात तरकारी माल घेऊन रस्त्याच्या कडेला पीक अप गाडी उभी होती. त्या गाडीला एका लाल रंगाच्या गाडीने अतिशय वेगात धडक दिली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मदतकार्य करून अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात कारचा अक्षरशः चाकाचूर झाला आहे. तसेच कारच्या पुढच्या नंबर प्लेटच्या जागी नंबर प्लेट ऐवजी ठाकूर अशी पाटी लावलेली होती. अपघात कशामुळे झाला?. अपघातावेळी कारमधील तरुण मद्यधुंद अवस्थेत होते का?. याचा पुढील तपास पौड पोलिसांकडून केला जात आहे, या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे.
पुण्याच्या मुळशी तालुक्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले. मुळशी तालुक्यातील पौडजवळ मध्यरात्री भरधाव कारची उभ्या पीक अप गाडीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा पुणे-कोलाड महामार्गावर ही घटना घडली आहे.. पौडच्या विठ्ठलवाडी फाटा परिसरात तरकारी माल घेऊन रस्त्याच्या कडेला पीक अप गाडी उभी होती. त्या गाडीला एका लाल रंगाच्या गाडीने अतिशय वेगात धडक दिली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत,
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मदतकार्य करून अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात कारचा अक्षरशः चाकाचूर झाला. तसेच कारच्या पुढच्या नंबर प्लेटच्या जागी नंबर प्लेट ऐवजी ठाकूर अशी पाटी होती. पुढील तपास पौड पोलिसांकडून केला जात आहे,

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…