पुण्यात ‘बर्गर किंग’वर FDAचा दणका; ‘झेप्टो’च्या गोदामावरही कारवाई

अस्वच्छता, अन्नसाठवणुकीतील त्रुटी; तुकाराम मुंढेंच्या FDAकडून मोठी कारवाई

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यठिकाणांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. कॅम्प परिसरातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’च्या आऊटलेटवर FDAने छापा टाकून परवाना निलंबित केला आहे. या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे.

दररोज मोठ्या संख्येने ग्राहक या आऊटलेटमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी येतात. मात्र, FDAच्या तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या हाताळणीसह स्वच्छतेबाबत काही गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती आहे. रेस्टॉरंटमधील अस्वच्छताही कारवाईचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

झेप्टोच्या गोदामावरही धाड

यानंतर FDAच्या पथकाने लोहगाव परिसरातील झेप्टोच्या गोदामावरही कारवाई केली. येथे रेफ्रिजरेटेड आणि फ्रोझन खाद्यपदार्थांच्या साठवणुकीत नियमांचे उल्लंघन आढळल्याची माहिती आहे. तपासणीदरम्यान तापमान नियंत्रणातील त्रुटी, मुदत संपल्यानंतरही खाद्यपदार्थांचा साठा, अस्वच्छ साठवण व्यवस्था आणि कीड नियंत्रणाच्या अपुऱ्या उपाययोजना आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले.

ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मोठ्या ब्रँडच्या ठिकाणीही अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. FDAच्या या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना स्वच्छता, साठवणूक आणि अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…