पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी ९ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींचे स्थानक बदलले

प्रवाशांनो लक्ष द्या! २३ ऑगस्टला पुणे यार्डमध्ये मोठे काम; प्रवासापूर्वी गाडीचे स्थानक आणि वेळ तपासा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे यार्डमध्ये रेल्वे मार्गावरील पॉईंटची क्षमता वाढविण्याचे काम रविवारी, २३ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ९ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे स्थानकातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे स्थानक बदलण्यात आले आहेत.

रेल्वेच्या अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार आणि विद्युत विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. यावेळी डीडीएस पॉईंटची क्षमता ५२ किलोवरून ६० किलोपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

‘या’ गाड्या राहणार रद्द

२३ ऑगस्ट रोजी दौंड-पुणे आणि पुणे-दौंडच्या दोन डेमू गाड्या, सातारा-पुणे डेमू तसेच मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे नेहमीच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्याऐवजी ‘या’ स्थानकांवर थांबा

मेगा ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुणे स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

– जयपूर-पुणे एक्स्प्रेस – खडकी येथे थांबेल.
– नागपूर-पुणे एक्स्प्रेस – हडपसर येथे थांबेल.
– जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस – हडपसर येथे थांबेल.
– अमरावती-पुणे एक्स्प्रेस – हडपसर येथे थांबेल.
– मुंबई-पुणे एक्स्प्रेस – खडकी येथे थांबेल.
– लोणावळा आणि तळेगावहून येणाऱ्या काही लोकल शिवाजीनगरपर्यंतच धावतील.
– बारामती-पुणे डेमू – दौंड येथेच थांबवण्यात येईल.

काही गाड्या पुण्याऐवजी खडकी, हडपसरहून सुटणार

ब्लॉकनंतर काही गाड्या पुणे स्थानकाऐवजी पर्यायी स्थानकांवरून रवाना केल्या जाणार आहेत. पुणे-जयपूर एक्स्प्रेस खडकीहून सायंकाळी ५.३५ वाजता, तर पुणे-नागपूर एक्स्प्रेस हडपसरहून सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल. पुणे-मुंबई एक्स्प्रेस खडकीहून सायंकाळी ५.५५ वाजता रवाना होणार आहे. याशिवाय पुणे-कोल्हापूर डेमू सातारा येथून, तर पुणे-लोणावळा लोकल शिवाजीनगर येथून सोडण्यात येणार आहे.

मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसलाही विलंबाची शक्यता

मेगा ब्लॉकचा परिणाम इतर काही रेल्वे सेवांवरही होण्याची शक्यता आहे. मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसला लोणावळा ते शिवाजीनगरदरम्यान सुमारे ४० मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता रेल्वेकडून वर्तवण्यात आली आहे. रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी तिकिटावरील स्थानक, गाडीची वेळ आणि बदललेला मार्ग आधीच तपासून घराबाहेर पडावे. विशेषतः पुणे स्थानक गाठण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांनी गाडी खडकी, हडपसर, शिवाजीनगर किंवा दौंड येथून सुटणार आहे का, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…