पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना

हजारो वादकांचा सहभाग ; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याची आयोजकांची माहिती

पिंपरी-चिंचवड, राजन शेळके ( प्रतिनिधी): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला रविवारी, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना देण्यात आली. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला. एकाच वेळी सर्वाधिक ढोल वाजविण्याचा विश्वविक्रम या सोहळ्यात नोंदविण्यात आला असून, या कामगिरीची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातील विविध ढोल-ताशा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला.

गिनीज रेकॉर्डच्या तयारीसाठी ढोल-ताशा पथकांची विशेष मांडणी करण्यात आली होती. विविध पथकांतील हजारो वादकांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या रणवाद्य परंपरेची ताकद दाखवून दिली. ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना अर्पण करण्यात आली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…