पार्थ पवार-कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा; पवार कुटुंबात लगबग

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार पार्थ पवार यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शुभकार्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या उपस्थितीची चर्चा सुरू होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या.कायनात धार यांची पवार कुटुंबातील कार्यक्रमांमध्ये उपस्थिती यापूर्वीही पाहायला मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार हे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते.

पवार कुटुंबासाठी मागील काही काळात अनेक कौटुंबिक घडामोडी घडल्या आहेत. आता पार्थ पवार यांच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…