पारगाव भातोडी येथे अनुलोमच्या माध्यमातून एसटी स्मार्ट कार्ड कॅम्प

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख )  : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी येथे एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरणासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांना एसटी स्मार्ट कार्ड योजनेची माहिती देऊन आवश्यक नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांना एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ सहजपणे मिळावा, तसेच स्मार्ट कार्डबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राम भालसिंग, अनुलोम जनसेवक व श्रीगोंदा नगर विधानसभा प्रमुख, वैभव भालसिंग, महेश शिंदे, सचिन संभाजी शिंदे, महेश दारकुंडे, प्रदीप शिंदे, हमीद शेख, राम ज्ञानेश्वर शिंदे, आदिनाथ सांगळे, नामदेव शिंदे, शिवा शिंदे, सनी शिंदे, सुरज शिंदे, प्रसाद पवार, अभि शिंदे, अनिल तनपुरे, अमृत शिंदे, गणेश गुंड, रोहन शिंदे, दादा मेजर शिंदे, भारत शिंदे, श्रीरंग गुंड, मुरलीधर गुंड आदी उपस्थित होते.

अनुलोमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती आणि सुविधा पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…