पहाटेच्या दुर्गादौडीने कोतूळमध्ये उत्साहाचे वातावरण!

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओम साईराम प्रतिष्ठान व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पहाटेच्या दुर्गादौडीमुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गादौडीचे हे दुसरे वर्ष असून, देवीचा जयघोष, भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणाऱ्या महिला व युवकांमुळे परिसरात चैतन्य पाहायला मिळत आहे.

पहाटेच्या सुमारास आयोजित या दुर्गादौडीत महिला, युवकांसह नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. हातात भगवे ध्वज घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गादौडीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होत आहे. देवीच्या जयघोषाने रस्ते दुमदुमत असून, नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुर्गादौड हा केवळ धार्मिक उपक्रम नसून युवकांमध्ये शिस्त, संघभावना, व्यायामाची आवड आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या युवकांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यासही मदत होत आहे. जागोजागी भगव्या ध्वजांचे औक्षण करून आणि फुलांची उधळण करत या दुर्गादौडीचे स्वागत करण्यात येत आहे.

पहाटेच्या दुर्गादौडीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्ते आणि युवक परिश्रम घेत आहेत. दरवर्षी या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत असून, भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या दुर्गादौडीमुळे कोतूळ परिसरातील नवरात्रोत्सवाची रंगत वाढली आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…