अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : शहरातील सावेडी भागातील पाईपलाईन रोडजवळील मोरया सांस्कृतिक मंडळाने ‘पर्यावरण रक्षण काळाची गरज’ या विषयावर जनजागृती करणारा देखावा सादर केला आहे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तसेच प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत सचित्र फलकांच्या माध्यमातून शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे.
मंडळाने केवळ गणेशोत्सवात देखावा सादर करण्यापुरते मर्यादित न राहता परिसरात वृक्षारोपण करून झाडांचे संगोपनही केले आहे. मंडळाचे सदस्य विविध प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. मंडळाचे सदस्य इंजिनियर सुरेश परदेशी यांनी या देखाव्याबाबत प्रतिनिधीला विस्तृत माहिती दिली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ओझोन स्तरावर होणारे परिणाम, घटते पर्जन्यमान आणि बदलते ऋतुचक्र याकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले. ‘पर्यावरण रक्षण आम्ही करतो आहोत, तुम्हीही करा!’ असे आवाहन मंडळाच्या महिला सदस्यांनी केले. तसेच गणेशोत्सवाच्या उर्वरित दिवसांत नागरिकांनी देखावा पाहण्यासाठी भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी श्री. सुरेश परदेशी, श्री. प्रभाकर गवांदे, श्री. नवनाथ खेडकर, श्री. दत्तात्रय सोनार, श्री. इंगळे, श्री. संदीप कांबळे, श्री. हरीष जोशी, श्री. धामेजा, श्री. येठेकर, श्री. पाटील, सौ. पाटील, सौ. येठेकर, श्रीमती दिपनायक मॅडम, सौ. कांबळे, सौ. गवांदे, सौ. खेडकर, सौ. इंगळे, सौ. संध्या परदेशी, सौ. सोनार, सौ. जोशी यांच्यासह गणेशभक्त उपस्थित होते.


