एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ठाणे जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या (Rain) सरी बरसल्याचं दिसून येत आहे. त्यातच, एकनाथ शिंदे हे मुरबाड येथे गेले असता, त्यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) वादळी वाऱ्यात अकडले होते, सुदैवाने पायलटच्या प्रसंगधावनतेमुळे ते सुखरुप जुहू येथील हेलिपॅडवर लँड करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण मुरबाड येथे लग्नासाठी जाताना शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात फसले होते. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत वादळातून हॅलिकॉप्टर बाहेर काढले. मुरबाडमध्ये अचानक सुरू झालेला पाऊस आणि वादळामुळे एकनाथ शिंदेंनी पुढील प्रवास टाळल्याची माहिती आहे. हॅलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हॅलिपॅडवर उतरवण्यात आले, शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सर्वजण सुखरुप आहेत.
कल्याण मध्ये एका लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बापगाव परिसरातील हेलिपॅडवर उतरणार होते. मात्र, अचानक आलेल्या वावटळीमुळे अवकाशात दृश्यमानता वाढली होती. त्यामुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जुहू येथे इमर्जनशी लँडिंग केल्याची माहिती मिळाली आहे. बापगाव हेलिपॅड येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तो आता हटवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला तीन महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या अपघातनंतर संबंधित विमान कंपनीच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, व्हिआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हवाई वाहतुकीसंदर्भाने सुरक्षेसाठी ठोस उपाय करण्याची मागणीही व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुरबाडजवळ वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणी आणि परिसराला झोडपून काढल आहे. त्यातच, एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाल्याचं दिसून आलं. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडली. घराचा पत्र आहे टेन्शन वायरमध्ये अडकताच जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन हीच प्रवाह खंडित करावा, अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून करण्यात आली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…