नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील

नागपूर : राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेत नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलिस दलाला अनुभवी आणि कठोर प्रशासनासाठी ओळखला जाणारा अधिकारी लाभला आहे. दरम्यान, विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
१९९७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रभावी नेतृत्वाची छाप सोडली आहे. पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण तसेच मुंबई पोलीस दलातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त आणि मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अलीकडे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.
२००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये दाखवलेल्या धाडसामुळे नांगरे पाटील यांचे नाव देशभर चर्चेत आले होते. कठीण परिस्थितीतही शांतपणे आणि धैर्याने काम करण्याची त्यांची शैली अनेकांसाठी प्रेरणादायी मानली जाते.उपराजधानी असलेल्या नागपुरात सध्या अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे, वाहतूक व्यवस्थापन आणि संघटित गुन्हेगारी यांसारख्या आव्हानांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा नव्या पोलीस आयुक्तांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच व्हीआयपी सुरक्षा आणि संवेदनशील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्याचा त्यांचा अनुभव शहरासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक, व्यावसायिक आणि युवक संघटनांकडून स्वागत होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिस दल अधिक आधुनिक, लोकाभिमुख आणि गुन्हेगारीविरोधी कारवाईत अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मनोहारी मैत्र संघातर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरण

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा आणि सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल तर ती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती केवळ सत्यावरच…

परोपकार, सद्वर्तन और ज्ञानातूनच जीवनकल्याण : ह.भ.प. बा.ल. चोथवे महाराज

नांदेड (प्रतिनिधी) :  पापापासून दूर राहणे, पुण्यकर्म करणे आणि निर्मळ वृत्तीच्या सज्जनांची संगत ठेवणे, हीच जीवनकल्याणाची त्रिसूत्री आहे. केवळ धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा प्रवचन श्रवण करून जीवनात परिवर्तन घडत नाही,…