नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीने सायंकाळी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय सुरेश नामक व्यक्तीने आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पत्नीचा खून केला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.दरम्यान, पोलीस ठाण्यात असताना सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास आरोपीने आत्महत्या केली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, कस्टडी डेथच्या प्रोटोकॉलनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


