दूध उत्पादकांना मोठा दिलासा! गायीच्या दुधाला ४१ रुपयांचा दर; राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करत गुजरातमधील अमूल संलग्न जिल्हा दूध संघांनी प्रमाणित गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४१ रुपये दर जाहीर केला आहे. यापूर्वी हा दर ४० रुपये होता. मात्र, राज्यातील बहुतांश स्थानिक खासगी दूध संस्थांकडून अजूनही प्रतिलिटर ३८ ते ३९ रुपये दरानेच दूध खरेदी केले जात असल्याने उत्पादकांमध्ये नाराजी कायम आहे.
दरम्यान, राज्यातील दूध संकलनात लक्षणीय घट झाल्याचेही समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दररोज सरासरी १.८० कोटी लिटर दूध संकलित होते. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये तब्बल २० लाख लिटरची घट झाली आहे. मे २०२६ मधील दुग्ध आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार, राज्यात १ कोटी ७९ लाख २२ हजार लिटर दूध संकलन झाले आहे.दूध संकलनातील या घटीमागे अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी मोहिमेचा परिणाम असल्याचा दावा दूध उत्पादकांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी बेकायदेशीर व्यवहारांवर आळा बसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दूध व्यवसायातही त्याचे परिणाम दिसून येत असल्याची चर्चा आहे.
याचबरोबर म्हशीच्या दुधाच्या संकलनातही घट झाली आहे. सोलापूर बाजारात सध्या म्हशीच्या दुधाला प्रति फॅटनुसार सुमारे १२ रुपये दर मिळत असून, त्यानुसार प्रमाणित म्हशीच्या दुधाचे दर ७२ ते १२० रुपये प्रतिलिटर या दरम्यान पोहोचले आहेत.दुसरीकडे, गुजरातमधील सहकारी दूध संघांनी दरवाढ केली असली तरी राज्यातील खासगी दूध संस्थांनी अद्याप खरेदी दर वाढवलेले नाहीत. राज्यातील दूध व्यवसायाचा मोठा हिस्सा खासगी संस्थांच्या नियंत्रणाखाली असल्याने दरवाढीचा लाभ सर्व दूध उत्पादकांपर्यंत पोहोचत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दूध भेसळीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. तज्ज्ञांच्या मते, काही भेसळखोर दुधातील प्रथिनांचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवून दाखवण्यासाठी मेलामाईनसारख्या घातक रसायनाचा वापर करतात. तसेच निकृष्ट दर्जाच्या दूध भुकटीपासूनही रासायनिक दूध तयार केल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…