दुष्काळग्रस्त बळीराजासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा मदतीचा हात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांचा धनादेश सुपूर्द

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) :  राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांची मदत दिली. महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अशी माहिती महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली.

राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाईही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर महासंघाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही महासंघाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांची मदत दिली होती. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन आणि जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा महासंघाने यंदाही कायम ठेवली आहे.

यावेळी वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ, महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे महामंत्री शंकरराव पहाडे, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य दत्ता धामणकर, निवासी सचिव दत्तात्रय न्हावकर, निर्मितीचे कार्याध्यक्ष वसंत काळे आणि निर्मितीचे उपमहामंत्री अनंत जाधव उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या सामाजिक जाणिवेतून महासंघाने केलेल्या या मदतीचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…