तेलिखुंट मंडळाचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

अखेरच्या दिवशी श्रींच्या आरतीसाठी मान्यवरांची उपस्थिती

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर केल्याबद्दल तेलिखुंट मित्रमंडळ ट्रस्ट या मंडळाला गेल्या चार-पाच वर्षांपासून सलग पारितोषिक मिळाले आहे. पूर्वनियोजन करून अतिशय कल्पकतेने देखावे सादर करणाऱ्या या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त आवर्जून गर्दी करतात.

यावर्षी मंडळाने तरुणाईला असलेले मोबाईलचे आकर्षण, त्याच्या वापराचा अतिरेक, त्यातून निर्माण होणारा खोट्या प्रतिष्ठेचा भ्रम, तसेच त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक, आर्थिक आणि वेळेच्या नुकसानासह कौटुंबिक घसरणीचा विषय घेऊन देखावा सादर केला. अखेरच्या दिवशी हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

देखाव्यासोबतच मंडळाने समाजातील मान्यवरांना आरतीसाठी निमंत्रित करण्याचा उपक्रमही राबवला. अखेरच्या दिवशी आरतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी, शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, प्रभागातील नगरसेवक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तेलिखुंट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सैंदर, उपाध्यक्ष रवींद्र म्हस्के, खजिनदार दिनेश सैंदर, सचिव तुषार रामदासी, तसेच संदीप मोकाटे आणि महेश निकम यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

रुग्ण सुरक्षा व गुणवत्ता सुधारणा विषयावर नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांच्या सहकार्याने ‘रुग्ण सुरक्षा व…

लाडकी बहनों के लिए दिवाली से पहले खुशखबरी! खाते में आएंगे ₹1500, सरकार ने मंजूर किए 344 करोड़ रुपये

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। दिवाली नजदीक है और ऐसे में कई महिलाएं सितंबर महीने…