नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्हा भावसार समाजाचे माजी सचिव इंजिनीयर सुरेश गोजे यांच्या सूनबाई डॉ. शिवानी नितीनकुमार गोजे-दर्जे यांनी वर्धा येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून आयुर्वेदातील द्रव्यगुण विज्ञान या विषयात एम.डी. पदव्युत्तर पदवीमध्ये सुवर्णपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले.
वर्धा येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आयोजित पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. शिवानी यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. डॉ. शिवानी नितीनकुमार गोजे-दर्जे या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील दुर्गादास दर्जे यांच्या कन्या आहेत. अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे पती डॉ. नितीनकुमार हे वैद्यकीय क्षेत्रात परिचित आहेत.
डॉ. शिवानी यांच्या या यशामुळे दर्जे व गोजे परिवारासह नांदेड येथील गोजे मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


