ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने विस्तार अधिकारी – पोपटराव धामणे यांचा सेवापूर्ती सत्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : सावेडी परिसरातील श्रीराम चौक ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी पोपटराव धामणे यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच निवृत्त झालेल्या धामणे यांचा शिक्षक नेते व केंद्रप्रमुख संजय शेळके आणि निवृत्त मुख्याध्यापक किसनराव गांगर्डे यांच्या हस्ते नेवासा येथील पैस खांबाची प्रतिकृती देऊन गौरव करण्यात आला.

पोपटराव धामणे यांनी उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी अशा विविध पदांवर काम करत विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचा भौतिक विकास तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या सेवेची सुरुवात ४ जानेवारी १९८८ रोजी जिल्हा परिषद शाळा, खेड (ता. कर्जत) येथून झाली. त्यानंतर बर्गेवाडी, अहिल्यानगर तालुक्यातील काळेवाडी, सारोळाबद्दी तसेच पीएमश्री शाळा निंबळक येथे त्यांनी विविध पदांवर सेवा बजावली. निंबळक येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सीएसआरच्या माध्यमातून सुमारे २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून शाळेच्या विकासाला चालना दिली. कोविडनंतर शाळेची पटसंख्या ६५० वरून ७५० पर्यंत वाढविण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना जेऊर केंद्राचा चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत नेण्यात त्यांचे योगदान राहिले.

विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना ‘मिशन आपुलकी’ उपक्रमाच्या माध्यमातून लोकसहभागातून मिळणारी वस्तूरूप मदत ६२ कोटींवरून ७२ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत शिक्षण विभागाला २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील उपविजेता ‘स्कॉच पुरस्कार’ मिळाला. जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासह विविध सन्मानांनी गौरविलेल्या धामणे यांनी आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ अधिकारी, सहकारी, कुटुंबीय आणि पत्नी शैला यांना दिले. यावेळी विस्तार अधिकारी रमेश भुजबळ, मुख्याध्यापक किसनराव गांगर्डे, हायकोर्टाचे रजिस्ट्रार नंदकिशोर पाठक, उद्योजक रावसाहेब गांगर्डे, मगन सोनवणे, मारुती फुलारी, मुख्याध्यापक भिकाजी गावडे, बाळासाहेब वाव्हाळ, ठकाजी टकले, सुभाष दारकुंडे, प्रगतशील शेतकरी कैलास नाकाडे, महादेव देवकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत वराडे, नक्का भाऊसाहेब, भरत साबळे, शिक्षक बाळू काटकर, राकेश घोडके, हरी पालवे, कटक मंडळातून निवृत्त शांतीकुमार शिरकुळ, हॉटेल सद्गुरूचे संचालक एकनाथ चेमटे, व्यावसायिक महेश पुंड, स्वच्छतादूत गोकुळ जायभाय आदी उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…