जन्मभूमीत झालेला सन्मान अविस्मरणीय!

सारोळा कासारमध्ये पोपट धामणे व उत्तम भोसले यांचा हृद्य सत्कार

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्यातील सारोळा कासार येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत सारोळा कासार आणि ज्ञानदीप मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पोपटराव धामणे आणि केंद्रप्रमुख उत्तमराव भोसले यांचा त्यांच्या जन्मभूमीत हृद्य सत्कार करण्यात आला.
आयुष्यभर शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या दोन्ही शिक्षणसेवकांचा गावकऱ्यांनी केलेला सन्मान हा कृतज्ञता, प्रेम आणि आपुलकीचा अनोखा आविष्कार ठरला.
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, निवृत्त शिक्षणाधिकारी अरुण धामणे, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन संजय कडूस, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संजय धामणे आणि सारोळा कासार सेवा सोसायटीचे चेअरमन महेश धामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना पोपट धामणे आणि उत्तम भोसले यांनी जन्मभूमीत मिळालेला हा सन्मान आयुष्यातील सर्व सत्कारांपेक्षा अधिक अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या गावातील माणसांनी दिलेले प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञता हीच आयुष्यभराची खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश काळे यांनी केले. निवृत्त मुख्याध्यापक संजय काळे आणि सारोळा ई-लर्निंग ग्रुपने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
सेवानिवृत्ती म्हणजे केवळ नोकरीतील प्रवासाचा शेवट; मात्र समाजाशी, गावाशी आणि जन्मभूमीशी जोडलेल्या नात्यांचा कधीच शेवट होत नाही. सारोळा कासार येथील या स्नेहपूर्ण सत्कार सोहळ्याने याच भावनेचा सुंदर प्रत्यय दिला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील

अहिल्यानगर. राधेश्याम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी…

नांदेडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!

नांदेड. शहरात पिण्याच्या पाण्याचा वाढता अपव्यय लक्षात घेता भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी आहे म्हणून त्याची किंमत नाही, ही मानसिकता बदलण्याची…