गोडसेवरील वक्तव्यावरून वाद: अभिजित दिपके यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

नागपूर : नाथुराम गोडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिजित दिपके यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार नाथुराम गोडसे हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप श्रीधर काळे यांनी प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बावसे यांना निवेदन देत दिपके यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.तक्रारीनुसार, एका माध्यम मुलाखतीदरम्यान दिपके यांनी नाथुराम गोडसे यांचा उल्लेख “स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी” असा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असून समाजात तेढ निर्माण करणारे व मानहानीकारक असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
महात्मा गांधी हत्येच्या प्रकरणातील न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणी शहानिशेसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…