गुणवंत कामगार कल्याण मंडळातर्फे ज्येष्ठ पत्रकार कै. शिवाजीराव शिर्के यांच्या स्मरणार्थ शोकसभा

पिंपरी चिंचवड, प्रशांत जाधव, (ब्युरो चीफ) : पवनेचा प्रवाह साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी कै. शिवाजीराव अमृतराव शिर्के (मामा) यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

कै. शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या कार्यातून समाज घडविण्याचे काम केले. त्यांच्या निधनाने शहराची मोठी सामाजिक हानी झाली असून, ती कधीही भरून निघणार नाही, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. भारतीताई चव्हाण यांनी केले. कामगार केंद्र, संभाजीनगर येथे आयोजित शोकसभेत त्या बोलत होत्या. या शोकसभेला पिंपरी चिंचवड शहरातील विविध साहित्यिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी, पत्रकार तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मामांवर प्रेम करणारे कासारवाडी परिसरातील तसेच सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरही उपस्थित होते.

शोकसभेची प्रस्तावना महंमदशरीफ मुलाणी यांनी केली. ह.भ.प. श्यामराव महाराज गायकवाड यांनी प्रवचनरूपी सेवा दिली. यावेळी इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक व माजी नगरसेवक अरुणभाऊ बोऱ्हाडे, बंधुता प्रतिष्ठानचे प्रकाशजी रोकडे, वकील असोसिएशनचे अशोकजी पगारिया, नवयुग साहित्य मंचचे राज अहिरराव, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे राजेश हजारे, दिलासा साहित्य मंचचे सुरेश कंक, प्रसिद्ध उद्योजक रामदास माने, ज्येष्ठ साहित्यिक, सावरकर मित्र मंडळ, पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, शाहूनगर वाचनालयाचे राजेंद्र घावटे, कलारंजन संस्था, पत्रकार श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपरी चिंचवड मारवाडी संघ, वाई तालुका मित्र मंडळ, सावरकर मित्र मंडळ, शब्दधनचे तानाजी एकोंडे, गिर्यारोहक अरविंद वाडकर, उद्योगनगर केंद्र प्रमुख प्रदीप बोरसे, मानवी हक्क संस्थेचे अण्णा जोगदंड, सातारा जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग सुतार, प्रकाश चव्हाण, पिंपरी चिंचवडचे ब्रँड अॅम्बेसेडर नंदकुमार धुमाळ तसेच सकाळ समूहाचे परिट यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करून कै. शिवाजीराव शिर्के यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. साखरचंद लोखंडे महाराज यांच्या उपस्थितीत पसायदान झाले. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून कै. शिवाजीराव शिर्के यांना अखेरचा निरोप दिला. साश्रू अंतःकरणाने शोकसभेची सांगता करण्यात आली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…