अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गणेश चतुर्थी व गणेशोत्सवानिमित्त आमदार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन करण्यात आले. यावेळी विधिवत पूजा-अर्चना करून श्री गणरायाची आरती करण्यात आली.
यावेळी आमदार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. आरती राजेश वानखडे, आई विमल श्रीरामजी वानखडे, शशिकांत वानखडे, सौ. प्रीती शशिकांत वानखडे, हिमांशू भुयार, सौ. धरती हिमांशू भुयार, चैतन्य शशिकांत वानखडे व चिन्मय शशिकांत वानखडे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. गणरायाच्या आगमनाने वानखडे परिवाराच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सर्वांनी विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या चरणी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा, अशी प्रार्थना केली.


